बाईक  वरचा  माझा पहिला अनुभव ...!!



मला लहानपणापासून सायकल आणि गाडीचा  फार नाद, आमच्या कुटुंबातील TVS  Victor हि पापा ने  घेतलेली पहिली बाईक ,तसा मी वडिलांना  लहानपणा पासून फार भितो ,त्यावेळी गावी मी ७ वि ला होतो तेव्हाचा माझा हा अनुभव,त्यावेळी माझे पाय काही गाडी वरून पुरत  नव्हते . नि मला फक्त  गाडी बद्धल फक्त  गाडीची रेस वाढवन , दोनीही ब्रेक सायकल सारखे पुढे आसतात  नि गियर कोठे असतात ते माहित होत. पण पुढे कि टाकावे कि मागे हे माहित नव्हत. दुपारची वेळ होती पप्पा जेवणासाठी घरी आले असताना मी गुप-चूप टेबलवरची चावी घेऊन बाहेर आलो,नि एक पाय जवळच्या ओठ्यावर ठेवला नि चावी लाऊन गाडीवर बसलो. घराच्या पुढे चांगला १ कि .मि  उतार असेल, मी आवाज  होऊ नये म्हणून हळूच गाडी पायांनी ढकलत घरापासून दूर आणत उताराला लागलो, गाडी उताराने चालू लागली तेव्हा मला फार आनंद होत होता. मी मोठा झाल्या सारख वाटत होत. तेवढ्यात गाढी अजून जोरात का चालत नाही म्हणून मी न कल्च दाबता पायाने गियर टाकला. नि गाडी चालू लागली मी अजून तसल्या उताराने रेस वाढवली जशी गाडी पळू लागली तसा आनंद मला वाटत होता. तशा उतरला नि एवढ्या फास्ट वेगात मी हवेत आहे नि हि सर्व जादू आहे असा भास झालेला, नि तशा परिस्थितीत त्या गाडीवरचा माझा ताबा सुटला. तीच समोरून चारा भरलेली बैल-गाडी येत होती नि तो गाडी वाला ओरडत होता, बाजूला घे .. । बाजूला घे…।। तेव्हा  नकळत मी ब्रेक समजून कल्च च  दाबला..  नि काय गाडी का थाबत नाही म्हणून समोर देव दिसू लागली होती. मी तशी गाडी बाजूला करायला गेलो, नि मी आणि गाडी दोघही नीट नालीत…!!तेवढ्यात बाजूने जात असलेल्या एका माणसाने मला नि गाडीला उचलले . मी पाहतोय तर माझ्या एका पायाला खरचटले होते नि  गाडीचे मागचे एक इंडिकेटर तुटलेले ..! माझी आता चागलीच फाटलेली पप्पा ला समजले तर चांगलाच मार बसणार होता.  मी तशीच गाढी पकडली नि हाताने चालवत घराजवळ होती तिथे आनून लावली. चावी होती तिथे ठेवली. नि पुस्तक उघून एका खोलीत गप्प जाऊन देवाला पार्थना करत बसलो. कि देवा पिल्ज पप्पांना हि मी केकेली करामत समजू नये मी यापुढे अस कधी हि नाही करणार. थोड्या वेळात पाप्पा वापस ऑफिस ला निघाले तेव्हा मला चांगलाच घाम  आला होता. पण त्या वेळी पप्पा ना इंडिकेटर तुटलेले समजले नसावे. पप्पा निघून गेले, मी जामं खुश झालो.
सायंकाळी पप्पा वापस आले तेव्हा मी बाहेरच खेळत होतो . मी मुद्धाम गाडीकडे पहिले नि जवळ जाऊन पप्पांना विचारले. हे कसे काय तुटले ,पप्पानी पण ते पहिले नि म्हणाले पार्किग मध्ये कोणी तरी गाडी काढताना धक्का दिला असेल बहुतेक … तर काय मेरे मन मे लड्डू फुटा .
                             मग जाग्यावरच देवाला धन्यवाद दिले. नि दुसऱ्या दिवसा पासून देवाला ,त्या केलेल्या पार्थना सर्व काही विसरलो . नि  तशीच गाडी गुप -चूप रोज रोज नेऊ लागलो तर काय गेली ना जमून.. नि हो    आता या गोष्टीला जवळ जवळ ९-१० वर्ष झाले ती गाडी आजून आम्ही वापरतो ,माझे ते गाडीवरून  पडणे पहिलेच आणि शेवटचे असावे हि देवाला पार्थना. मी आता चांगला रायडर झालो  आहे. अजून पण कोणालाही हि माझी पडण्याची गोष्ट माहित नाही .  मला आमच्या या गाडीने बरंच काही शिकवलं ,ऐन वेळी मदत केली ,वायीट पेक्षा चांगले अनुभव जास्त दिले. मी या आमच्या गाडीला धन्यवाद देतो . . . !!!!

Comments

Popular Posts