कुठे न्यायची सोय नाहीये तुला !
"कुठे न्यायची सोय नाहीये तुला !" घंटेचे टोले झाले. शाळा सुटली. वर्गा वर्गा मधून मुलांचे थवे बाहेर पडले. कोणी रिक्षावाल्या काकांच्या मागे पळाले. कोणी आई बाबांबरोबर सायकल/ स्कूटर वर बसले. मंदार आणि अभिजित गप्पा मारणा-या आपापल्या आयांच्या मागे पुढे राहत, पाठीवरची दप्तरे उडवत, मस्ती करत घराकडे निघाले. अभिजित चे घर आधी यायचे. तिथवर आले तरी आयांच्या गप्पा संपेनात. मग अभिजित ची आई म्हणली, "अहो मंदारच्या आई, घरी या ना. चहा घेऊन पुढे जा". चहाबरोबर शि-याच्या बशा आल्या. थोड्या वेळाने मंदार आईच्या कानाला लगटून लाजाळूपणे काहीतरी कुजबुजू लागला. आईच मग म्हणली, "अरे मोठ्याने बोल ना, असं कानात कानात काय चाललंय ?" "आई, या शि-याचा रंग असा का आहे" ? "असा म्हणजे काय ? त्यात केशर घातलंय". "मग आपण केशर का नाही आणत ? मग आपला पण शिरा चांगला होईल". आई ला मेल्याहून मेल्यासारखं झालं. "बर, पुढल्या वेळी घालू या" असा तह करून आईने गप्पा आटोपत्याच घेतल्या. आईने घराची कडी काढली आणि मंदारच्या पाठीत हलकासा धपाटा ...







