शांत तू बसू नकोस..!!


हार झाली आहे तुझी म्हणून तू रडू नकोसप्रयत्न करायचे मात्र तू कधी सोडू नकोस,

 कोणी किती ही हिणवले तरी ध्येय तू सोडू नकोस,

 हार झाली आहे तुझी म्हणून तू रडू नकोस..!!

 कोणी किती ही फसवले तरी तू काही थांबू नकोस,

 विचार कर पुन्हा पुन्हा मार्ग तू चालताना,

 अडकलास जरी कोठे तरी शांत तू बसू नकोस..!!

Comments

Popular Posts