तु फक्त साथ दे....!



चेहर्‍यावर दिसेल
इतकाच आनंद दे
मनात लपेल
इतकेच दुखः दे
रुक्ष ह्या मनाला
प्रेमाचा स्पर्श दे
गंध फुलाचा तू घे
तुझे हसणे निर्व्याज दे
भारलेल्या मनाला
थोडा विसावा दे
अंधारलेल्या ह्या जीवनाला
आशेचा प्रकाश दे
मूक माझ्या शब्दांना
तुझा आवाज दे
माझ्या कल्पनांना तुझ्या
स्वप्नांचा साज दे
कधी स्वप्नात ये
हळूच साद दे
एकाकी आहे ग मी
तु फक्त साथ दे....!

Comments

Popular Posts